Wednesday, February 8, 2023

शहरात डासांची उत्पती वाढली; कोरोनासह आता डेंग्यूचाही धोका

- Advertisement -

औरंगाबाद : मनपाकडून डासांना आळा बसण्यासाठी करण्यात येणाऱ्या धूरफवारणीला ठेंगा दाखविण्यात येत आहे. वाढत्या पावसामुळे शहरात डासांची आणि माशांची ही उत्पत्ती वाढली आहे. मागील सहा महिन्यापासून डेंग्यूचे 30 संशयित रुग्ण आढळले. मात्र या कालावधीत अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

शहरात दर तीन वर्षांनी डेंग्यूची साथ पसरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. तो पाहता यंदा डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका वर्तवला जात आहे . त्यामुळे यंदा कोरोनासोबतच डेंग्यूसह विविध साथरोगांना रोखण्याचे आव्हान मनपा आरोग्य विभागासमोर आहे. पावसाळा सुरू होताच आरोग्य विभागाने सात रुपये प्रतिबंधसाठी ऑबेटिंग, औषध फवारणी, दूर फवारणी करणे अवशयक आहे. असे कुठलेच प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत नाही.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून शहरात सर्दी, खोकला व तापीचे रुग्ण वाढले आहेत. मात्र या पश्वभूमीवर मनपा आरोग्य विभाग साथरोग प्रतिबंधाच्या उपयोजना केवळ मोजक्याच भागात राबवित असल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.