हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित असणाऱ्या ‘समांतर’ या वेबसिरीजचे आगामी पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशीने ‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांसह शेअर केला होता. त्यानंतर आता या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. समांतर’च्या पहिल्या पर्वाच्या शेवटाने सर्वानाच प्रश्नचिन्हात टाकले होते आणि प्रेक्षकांमध्ये ‘समांतर २’ ची उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर आता लवकरच ‘समांतर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि बातमी मिळाल्यानंतर चाहते अत्यंत खुश आहेत.
https://www.instagram.com/p/CQYCffNnJTW/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये जरी संपूर्ण कथानकाचा सुगावा लागत नसला तरी इतकं नक्कीच कळतंय कि, सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्याशी कुमार महाजनच्या आयुष्याचा काय संबंध आहे हे या पर्वात उलघडणार आहे. हि वेबसिरीज मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत येत्या १ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांसाठी एम एक्स प्लेअर वर प्रदर्शित होणार आहे. इतकेच नव्हे तर यावेळी सिरीजमध्ये आणखी एका पात्राचा समावेश होतोय आणि हि भूमिका अभिनेत्री साई ताम्हणकर साकारताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CQSs3aNFBsn/?utm_source=ig_web_copy_link
दोन काळ, दोन व्यक्ती आणि एक रहस्य असणारे हे गुढमय कथानक कदाचित या पर्वात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ असेल किंवा मग या पर्वाचा शेवट पुन्हा एकदा एका नव्या प्रश्नासह होईल आणि आपण पुढील पर्वाची वाट पाहू. अद्याप या पर्वाची सर्वत्र चर्चा असून यात नेमके काय घडणार आणि काय काय रहस्य उलघडणार? कुमार आपल्या मृत्यूचे कारण जाणू शकेल का? आयुष्यात घडणाऱ्या पुढील गोष्टी कुमार वेळेआधी जाणून बदलू शकेल का? नियतीच्या चक्रात कुमार अडकेल कि सुटेल? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन ‘समांतर २’ येत आहे.
https://www.instagram.com/p/CQNhcKhFtD1/?utm_source=ig_web_copy_link
‘समांतर’च्या पहिल्या पर्वात स्वप्निल जोशीने ‘कुमार महाजन’ची तर नितीश भारद्वाज यांनी ‘सुदर्शन चक्रपाणी’ हि व्यक्तिरेखा साकारली होती. पहिल्या पर्वानुसार कुमार सुदर्शन चक्रपाणी यांचा शोध घेत असतो. कारण त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी चक्रपाणींचा भूतकाळ असतो. कुमार त्यांचा शोध घेतो आणि मग होते कथेला सुरुवात. चक्रपाणी त्यांच्या भूतकाळात घडलेल्या घटनेची डायरी कुमारच्या हातात देत, तू भविष्यातील गोष्टी टाळू शकत नाहीस असे सांगतात. त्या डायरीनूसार कुमारच्या आयुष्यात काही घटनाही घडतात ज्या बदलण्याचा तो अतोनात प्रयत्न करतो मात्र.. इथेच कथेचा आणि पर्वाचा शेवट होतो आणि इथूनच ओढ लागते ती ‘समांतर २’ची.