खरंच…फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल 24 कॅरेट सोनं ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणे हे ह आपल्या भारतीयांची कमजोरी आहे. त्यचवेळी, फक्त एका रुपयातच सोने खरेदी करायला मिळत असेल तर काय म्हणावे. होय, देशातील पेटीएमसह अनेक ई-वॉलेट कंपन्या आता आपल्याला एका रुपयात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहेत. या प्लॅटफॉर्मवर विकले गेलेले सोने हे 24 कॅरेट 99.9 शुद्धतेसह आहे. येथे आपल्या वतीने खरेदी केलेले सोने हे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते. आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हा या सोन्याची होम डिलिव्हरी घेऊ शकता. तज्ज्ञांचे याबाबतीत असे म्हणणे आहे की एक रुपयाची गुंतवणूक करुन आपण हळूहळू ही रक्कम वाढवू देखील शकता. तसेच, जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण सोने किंवा अगदी जास्तीचा परतावा मिळवू शकता.

प्रश्न : केवळ 1 रुपयात 24 कॅरेट सोने कसे आणि कुठे खरेदी करावे ?
उत्तर : पेटीएम गोल्ड वरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पेटीएम अ‍ॅपवरील गोल्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आपण येथे सोने खरेदी करू शकता. आपले सोने हे एमएटीसी-पीएमपीच्या लॉकरमध्ये अगदी सुरक्षित असेल. खरेदी करण्याशिवाय आपण येथे सोन्याची विक्री देखील करू शकता.

प्रश्न : पेटीएम गोल्ड वर आपण सोने कसे खरेदी करू शकता ?
उत्तर : आपण पेटीएम वरून डिजिटल सोने खरेदी करू शकता. 0.0005 ग्रॅम ते जास्तीत जास्त 50 ग्रॅम पर्यंतचे सोने खरेदी करण्याची आपल्याकडे संधी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 0.0005 ग्रॅम सोने 1 रुपयात खरेदी करता येईल. त्यात करांसह अन्य कोणत्याही शुल्काचा समावेश नाही. अशा परिस्थितीत जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमच्या वेबसाईटवर किंवा अ‍ॅपवर जाऊन सर्व अटींविषयीची माहिती मिळवा. या प्लॅटफॉर्मवर विकले गेलेले सोने हे 24 कॅरेट 999.9 शुद्धतेचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. आपण पेटीएमच्या डिजिटल लॉकरमध्ये हे सोने सुरक्षित ठेवू शकता.

प्रश्न : एका रुपयात आणखी कोठून सोने खरेदी करता येईल?
उत्तर : पेटीएमप्रमाणेच फोनपे देखील 1 रुपयात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे सोने विकू देखील शकता. मात्र, ते विकण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे किमान 5 रुपये सोने असले पाहिजे. हे एका दिवसात विकत घेतले जाऊ शकते. आपल्याला फोनपेच्या अ‍ॅपवर याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकते. MMTC-PAMP जगातील पहिल्या गोल्ड अकाउंट्स पैकी एक आहेत, ज्यात डिजिटलपणे एक्सेस केला जाऊ शकतो. यामध्ये ग्राहक 999.9 शुद्ध प्रमाणित सोन्यासाठी कमीतकमी 1 रुपयात खरेदी, विक्री, रिडिम किंवा ट्रान्सफर करू शकतात. ते आंतरराष्ट्रीय किंमतीशी लिंक केल्या गेलेल्या कोणत्याही थेट किंमतीवर हे करू शकतात. वर्षभरात ते 24/7, 365 दिवस उपलब्ध आहे आणि MMTC-PAMP ग्राहकांना अल्प प्रमाणात सोने खरेदी आणि जमा करण्याचा पर्याय देखील देते. फिजिकल डिलीवरीसाठी नंतर रिक्वेस्टही केली जाऊ शकते. पेटीएम, गुगल पे, Fisdom तसेच मोतीलाल ओसवाल आणि एचडीएफसी बँक सिक्युरिटी सारख्या वित्तीय संस्थांवर ही सेवा उपलब्ध आहे.

प्रश्न : मी हे सोने विकू शकतो?
उत्तर : पेटीएमवर खरेदी केलेले हे सोने विकण्यासाठी पेटीएमच्या अ‍ॅपवर जा आणि ‘गोल्ड’ आयकॉन सिलेक्ट करा. आता ‘सेल’ वर क्लिक करा, हे पेजच्या टॉपवर दिसेल. किती रुपयांच्या सोन्याची विक्री करायची आहे किंवा किती सोने विकायचे ते म्हणजे अमाउंट किंवा क्वांटिटीच्या आधारे सोने विकले जाऊ शकते. उदाहरणार्थ, आपल्याला जर 0.1 ग्रॅम सोन्याचे किंवा 1 रुपयाचे सोने विकायांचे असेल तर आपला पर्याय निवडा आणि सेल ट्रान्सझॅक्शनसाठी बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड जोडा. IMPS फी म्हणून तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर, पुढील 48 तासांच्या आत आपल्या सोन्याच्या विक्रीची रक्कम आपल्या खात्यात असेल. काही स्टेप्स फॉलो केल्यावर, तुम्ही विक्री केलेल्या सोन्याची किंमत आपल्या बँक खात्यात जमा होईल.

प्रश्न : ते किती सुरक्षित आहे?
उत्तर : या प्लॅटफॉर्मवर विकले गेलेले सोने हे 24 कॅरेट 99.9 शुद्धतेचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. येथे आपण खरेदी केलेले सोने हे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते आणि आपल्याला जेव्हा हवे असते तेव्हा या सोन्याची होम डिलिव्हरी घेता येते.

प्रश्न : जेव्हा हवी तेव्हा डिलिव्हरी मिळू शकते?
उत्तर : पेटीएम गोल्डच्या शुद्धतेची 100 टक्के हमी आहे आणि एक ग्रॅम होताच आपल्या सोन्याची डिलिव्हरी आपल्या ऑर्डरवर होईल. डिलिव्हरी ही 1, 2, 5, 10, 20 ग्रॅमच्या नाण्यांमध्ये होते. यासह, पेटीएम आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्म वरून डिजिटल ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी कॅशबॅक म्हणून डिजिटल सोने घेण्याचा पर्याय देखील देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment