हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Most Romantic Places In Pune) प्रेमाच्या नात्यात भांडणाशिवाय मजा येत नाही. त्यामुळे जोडप्यामध्ये लुटुपुटु का होईना छोटूस तरी भांडण व्हायला हवं. म्हणजे कसं एकमेकांचा राग रुसवा घालवण्यासाठी गोड प्रयत्न करता येतात. ज्यामुळे नात्यातली वीण आणखी घट्ट होते. अनेकदा कामाच्या व्यापात आपण आपल्या जोडीदाराला आवश्यक तितका वेळ देऊ शकत नाही. मग कधीतरी डेट म्हणून हॉटेलात जेवणे, सिनेमाला जाणे अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. पण किती दिवस तेच तेच?
कधीतरी निसर्गरम्य वातावरणात तळ्याकाठी बसून तासनतास गप्पा माराव्या वाटत असेलच ना!! पण आसपास असं एखाद सुंदर स्थान असेलच असं नाही. मग सुरु होते अशा ठिकाणांची शोधाशोध. तुमचाही शोध सुरु असेल, तर तो थांबवा. (Most Romantic Places In Pune) कारण आज आम्ही तुम्हाला पुण्यातील काही अत्यंत सुंदर आणि नयनरम्य अशा शांत तसेच निवांत स्थळांविषयी सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हवा तसा एकांत एन्जॉय करू शकता. चला तर वेळ न घालवता या ठिकाणांची माहिती घेऊया.
पवना तलाव
जर तुम्ही पुणेकर असाल तर तुम्हाला पवना तलाव माहित असेलच. हे ठिकाण कॅम्पिंगसाठी लोकप्रिय आहे. शिवाय कपल्ससाठी तर हे लोकेशन एकदम परफेक्ट आहे. (Most Romantic Places In Pune) रोज घरातल्या घरातल्या गप्पा मारून आणि त्याच त्याच भिंतींमध्ये सहवासाचा जाच होऊ लागला की एखादी रात्र चांदण्यांखाली घालवण्यासाठी या ठिकाणाची निवड करा. तुम्हाला कॅम्पिंग करायचे नसेल तरीही तुम्ही इथे जाऊ शकता.
खास करून सनराईज आणि सनसेटची दृश्य फारच सुंदर असतात. (Most Romantic Places In Pune) येथे कॅम्पिंगची किंमत एका रात्रीसाठी तंबू घेत असाल तर प्रति व्यक्ती ११९९ रुपये इतकी आहे. दुपारी ४ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यंत तुम्ही या ठिकाणी राहू शकता. मुख्य म्हणजे या पॅकेजमध्ये तुम्हाला तंबू, फूड आणि काही अॅक्टीव्हिटीज करण्याची संधी मिळते. त्याचा पुरेपूर लाभ घ्या.
मुळशी धरण
(Most Romantic Places In Pune) आपल्या पार्टनरसोबत सुंदर क्षण घालवण्यासाठी खळखळणारे पाणी, आल्हाददायक हवामान आणि हिरवळ असलेले एखादे ठिकाण मिळाले तर क्या बात है!! असं एक ठिकाण पुण्यात आहे. ते म्हणजे मुळशी धरण. पुण्यातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक अशा या ठिकाणी अनेक कपल्स निवांत क्षण घालवण्यासाठी येतात. संध्याकाळी येथील दृश्य आणखीच सुंदर आणि विलोभनीय दिसते. त्यामुळे मुड एकदम फ्रेश होतो. पुण्यातील हे सर्वोत्तम रोमँटिक ठिकाण मानले जाते.
रुफटॉप डायनिंग (Most Romantic Places In Pune)
पुण्यात अनेक रेस्टोरंट आहेत. ज्यामध्ये काही रुफटॉप रेस्टोरंटचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत कधी एकांत हवा असेल आणि खास करून सरप्राईज द्यायचा मूड असेल तर रुफटॉप रेस्टॉरंट तुमच्या यादीत असायला हवे. कारण इथून तुम्ही उंचावरून आजूबाजूचे सुंदर नजारे पाहत थंड हवेचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील शांत वातावरण तुमच्या मनाला प्रफुल्लित करते. त्यामुळे एखाद्या संध्याकाळी पार्टनरला घेऊन रुफटॉप रेस्टोरंटमध्ये डिनर जरूर करा.