कानपूर पोलीस हत्याकांडातील मोस्ट वॉण्टेड विकास दुबेला उज्जैनमधून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उज्जैन । कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.

२ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दबा धरून अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर ५ लाखांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विकास दुबे महाकाल मंदिरात जात असताना एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं आणि पोलिसांना माहिती दिली. चौकशी केली असता त्याने आपली ओळख उघड केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे”.

विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा
गेल्या एक आठवड्यापासून उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. यासाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जात होती. दरम्यान आज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment