चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आईसह तिच्या प्रियकरास अटक; पं.स. सदस्याला बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | स्वतःच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केलेली आई प्राची सुशांत वाजे व तिचा प्रियकर पंचायत समिती सदस्य अमरसिंह विश्वासराव पाटील या दोघांना आष्टा पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉरच्युनर गाडी जप्त केली आहे.

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात संबंधित पत्नी व तिच्या प्रियकरावर खूनाचा तसेच प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत वाजे यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.

प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होते. ऑगस्ट 2021 ते 6 ऑक्टोम्बर या कालावधीत अमरसिंह पाटील याने प्राचीला फूस लावून तिचेशी अनैतिक संबंधसाठी साडेतीन वर्षाचा मुलगा मनन याचेसह तिला आपले घरी नेऊन ठेवले. प्राची व अमरसिंह यांनी मनन यास मारहाण व छळ करून 6 ऑक्टोम्बर 21 रोजी त्याचा खून केला.

त्याच्या प्रेताची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी ते प्रेत मुंबई येथून फॉरच्युनर गाडीमधून बिळाशी येथे आणले. सुशांत वाजे यांना कोणतीही माहिती न देता वाकुर्डे गावात प्रेताचा अंत्यविधी दहन करून परसपर विल्हेवाट लावली.

मनन मुंबई येथे मयत झाला असता अमरसिंह व प्राची यांनी ग्रामसेवक बिळाशी यांचेकडे सादर केलेले प्रतिज्ञा पत्रासोबत दिलेल्या जबाबात मनन याचा मृत्यू बिळाशी येथे झाल्याची खोटी माहिती दिली आहे. या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Leave a Comment