लग्नाहून परतताना भरधाव कारने माय-लेकाला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | भावाच्या मुलाचे लग्न आटोपून दुचाकीने बीड जिल्हयातील गावाच्या दिशेने निघालेल्या आई-मुलाला समोरुन भरधाव आलेल्या कारने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास नवीन बायपास रस्यावरील गांधेली शिवाराजवळ हा अपघात घडला.

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील कौशल्याबाई किशन धोत्रे (48) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर धोत्रे (25, दोघेही रा. राजपिंप्री) हे वाळुज परिसरात नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आले होते. दुपारी चारच्या सुमारास कौशल्याबाई या मुलगा ज्ञानेश्वरसोबत दुचाकीने (एमएच-23-व्ही-1862) गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. नवीन बायपासने जात असताना दुपारी चारच्या सुमारास गांधेली शिवाराजवळ समोरुन भरधाव आलेल्या कारने (एमएच-20-ईई-7455) ज्ञानेश्वरच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीसह दुरवर फेकले गेले.

या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार काशीनाथ लुटे, सोपान डकले, संतोष टिमकीकर आणि संपत राठोड या दोघांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment