धक्कादायक ! जुन्या वादातून तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील वडाळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत 31 वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना तिकडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि घटना 30 मे रोजी कोकरी आगार येथील न्यू माडा इमारतीत रात्री साडेदहा वाजायच्या सुमारास घडली आहे.

मृत तरुणाचे नाव वसंत कुमार देवेंद्र असे आहे. वसंत कुमार देवेंद्र याचा काही दिवसांपूर्वी परिसरात राहणाऱ्या इतर तरूणांशी वाद झाला होता. यानंतर या वादाचा राग मनात धरून 30 मे रोजी रात्री साडेदहा वाजता वसंतकुमार याच्याजवळ दोन तरुणांनी येऊन वाद घातला. यानंतर हा वाद एवढा वाढला कि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तेव्हा त्या दोन तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याने वसंतकुमार याच्या अंगावर वार केले. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

हा हल्ला झाल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण रुगालयात जाण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.