लव्ह मॅरेज करूनसुद्धा नशिबी आला वनवास; आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील संजय गांधीनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यशोधरानगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मेघा सूरज कांबळे असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय विवाहित महिलेचं नाव असून त्या नागपूर शहरातील संजय गांधी नगर परिसरात वास्तव्याला होत्या. मेघा यांनी सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या माहेरच्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

मेघा यांचा संजय गांधीनगर परिसरातील सूरज याच्याशी प्रेमविवाह झाला होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात सुखी संसार होता. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा देखील आहे. मेघा आणि सुरज हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते. यातून त्यांची ओळख झाली आणि याचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर या दोघांनी प्रेमविवाह करण्याच निर्णय घेतला. पण घरच्यांनी त्यांच्या या लग्नाला विरोध केला. यानंतर या दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. सुरज हा पेंटिंगचे काम करतो. तसेच त्याला दारूचे व्यसनसुद्धा आहे. त्याच्या याच व्यसनामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात असाच वाद झाला. या वादामुळे नाराज होऊन मेघा आपल्या माहेरी निघून गेल्या. गेल्या दोन दिवसांपासून ती तणावात होती. सोमवारी दुपारी तिची आई काही कारणामुळे घराबाहेर गेली होती. यावेळी मेघा आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा दोघंच घरात होते. यादरम्यान मेघाने मुलाच्या डोळ्यादेखत घरातील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. काही वेळाने मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने मेघाची आई घरात गेली. तेव्हा मेघा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर आईने आरडाओरड केली. यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने मेघाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment