हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोशल मीडियावर एखादी घटना व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ समोर आला की, यांच्याकडून त्याच्याकडे आणि त्याच्याकडून ह्याच्याकडे होत तो व्हिडीओ कधी ट्रेंडमध्ये येतो समजत नाही. असाच तीन आठवड्यांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एका महिलेच्या हातून तिचा ८ महिन्याचा मुलगा अपार्टमेंटच्या चोथ्या मजल्यावर खाली पडला होता. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचा जीव बचावल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे त्या मुलाची आई मात्र फार ट्रोल झाली होती. दिवसेंदिवस हे ट्रोलिंग इतके भीषण होत गेले की, असह्य झाल्याने या महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
नैराश्यातून केली आत्महत्या
ही घटना तामिळनाडूमधील कोईमतूरमध्ये घडली आहे. या महिलेच्या आत्महत्येच्या ३ आठवडे आधी तीच्या हातून तिचाच ८ महिन्याचा मुलगा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खाली पडला होता. ज्याला तिसऱ्या मजल्यावरील लोकांनी सुखरुप वाचवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महिलेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमुळे ती मानसिक तणावाखाली आली आणि तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोईमतूर येथे एका महिलेचा (वय ३३ वर्ष) मृतदेह तिच्या आई-वडिलांच्या घरात आढळला. घटनेवेळी महिलेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. तर मृत महिला व तिचा पती चेन्नईमध्ये एका आयटी कंपनीत काम करत असल्याचे समजत आहे.
पोलिसांनी दिली माहिती
या घटनेबाबत करमादाई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, ‘मृत महिला तिचा पती व २ मुलांसह सुमारे दोन आठवड्यापूर्वी चेन्नईहून कोईमतूरला आपल्या आई – वडिलांना भेटायला आलेली. दरम्यान, शनिवारी तिचे आई- वडील आणि पती घराबाहेर असताना तिने आपले आयुष्य संपवून घेतले. याबाबत कोईमतूरमधील करमादाई पोलीस ठाण्यात आयपीसी कलम १७४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून महिलेचा मृतदेह मेट्टुपालयम सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आ’हे.
निष्काळजी कृत्यामुळे झाली होती ट्रोल
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या २८ एप्रिल २०२४ रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एक ८ महिन्याचं बाळ पत्र्याच्या छतावर लटकले होते. हे बाळ अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून बाल्कनीतून आपल्या आईच्या हातून सटकून पत्र्याच्या छतावर अडकले होते. दरम्यान, या चिमुकल्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी पहिल्या मजल्याच्या छतावर चढून त्याला रेस्क्यू केले. बाळ जमिनीवर कोसळण्याच्या शक्यतेमूळे खाली जमिनीवर गाद्या अंथरण्यात आल्या होत्या. मात्र, या बाळाला एका व्यक्तीने पकडले आणि सुखरूप आईकडे सुपूर्त केले.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी बाळाच्या आईला दोष दिला. घटनेमागील सत्य जाणून घेण्याचे कुणीही कष्ट घेतले नाहीत. जो तो केवळ या बाळाच्या आईला बोल लावत होता. हे ट्रोलिंग दिवसागणिक वाढत गेलं आणि यामुळे महिला नैराश्यात गेली व तिने आपले आयुष्य संपवून घेतले.