नोकरीची चिंता द्या सोडून, आता Mother Dairy सह सुरू करा ‘हा’ व्यवसाय, पहिल्या दिवसापासूनच कराल कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण या कोरोना काळात आपली नोकरी गमावली असेल आणि नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही आपल्याला एका अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच आपण मोठी कमाई करू शकता. डेअरी उत्पादन कंपनी मदर डेअरीबरोबर व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायवेट लिमिटेड कंपनी आपल्या फ्रेंचाइजीची ऑफर देत आहे. ही फ्रेंचाइजी घेऊन आपणही आपला व्यवसाय उभा करू शकता. दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की, त्याचा वापर दररोज केला जातो. तोटा न होण्याची शक्यता असते. जर आपणही या कमी गुंतवणूकीसह फ्रेंचाइजी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आपण मदर डेअरीकडे जावे. यात केवळ 5 ते 10 लाखांची गुंतवणूक आहे.

आपण या उत्पादनांमधून करू शकता कमाई-
हे भारतीय कृषी उद्योगातील सर्वात मोठे फ्रेंचाइजी नेटवर्क आहे. अलीकडेच कंपनीने पहिल्यांदाच बेकरी सेगमेंट मध्ये उतरण्याची प्लॅनिंग केली आहे. त्याअंतर्गत कंपनीने तीन प्रकारचे ब्रेड बाजारात आणले आहे. कंपनी दूध, दुधाची उत्पादने आणि इतर खाद्य पदार्थ बनवते आणि विकते. दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त ही कंपनी फळे, भाज्या, खाद्यतेल, खाद्यपदार्थ, लोणचे, फळांचे रस, जाम यासारख्या वस्तू देखील तयार करते. कंपनीकडे जवळपास 2500 रिटेल आउटलेट्स आहेत आणि आता ते हळूहळू हे नेटवर्क विस्तारण्याची योजना आंखत आहेत.

याप्रमाणे सुरू करा प्लॅनिंग –
मदर डेअरीने देशात सुमारे 2500 आउटलेट्स उघडले आहेत. मदर डेअरीची फ्रँचायझी घेण्यासाठी चांगली गुंतवणूक आवश्यक आहे. ही गुंतवणूक आपली जागा आणि लोकेशननुसार कमी-अधिक प्रमाणात असू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 5 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यात 50,000 रुपये स्वतंत्रपणे ब्रँड फी म्हणून द्यावे लागतील. मात्र, कंपनी कोणतेही रॉयल्टी फीस आकारत नाही.

इतकी कमाई होईल
दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात पहिल्याच दिवसापासून पैसे मिळू लागतात. जे लोक मदर डेअरी फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी मदर डेअरी डिस्ट्रीब्यूटरशिप मार्जिन खूप महत्वाचे आहे. पहिल्या वर्षामध्येच गुंतवणूकीवर तुम्हाला 30 टक्के रिटर्न मिळू शकेल. गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी सुमारे 2 वर्षे लागू शकतात. मदर डेअरीमध्ये गुंतवणूकीनंतर त्याचा फायदा दरमहा सुमारे 44,000 रुपये इतका होऊ शकतो.

ही कागदपत्रे आवश्यक असतील
आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र द्यावे लागेल. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी रेशनकार्ड, विजेचे बिल याची कॉपी द्यावी लागेल. यासह बँक खात्याचा तपशील, छायाचित्रे, ई-मेल आयडी, फोन नंबर, प्रॉपर्टीची कागदपत्रे आणि NOC सर्टिफिकेट आवश्यक असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment