नाशिक हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून सासूची हत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या (Murder) केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू (Murder) झाला, तर पत्नी आणि मुलगी गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे.

सासूची हत्या, पत्नी आणि लेकीवरही वार
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात बाळा निवृत्ती भुतांबरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते गावातील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झाले होते. आरोपी किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई सासरी नांदायला जात नव्हती. घटनेच्या वेळी सकाळी दहा वाजता किसन पारधी याने पत्नी इंदुबाई नांदायला का येत नाही? अशी कुरापत काढत तिच्यावर विळ्याने हल्ला केला. त्यावेळी सासू कमळाबाई सोमा भुताबरे आणि मुलगी माधुरी या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपीने मुलीच्या हातावरही विळ्याने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने सासू कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात आणि पाठीत कात्रीने वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू (Murder) झाला.

या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात किसन पारधी विरोधात भादवि कलम 302, 307, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना घडलेल्या ठीकाणी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक पोलीस दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन पारधी याला अटक केली आहे. या हल्ल्यात आरोपीदेखील जखमी झाल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, पोलीस हवालदार शितल गायकवाड, रविराज जगताप, शिवाजी शिंदे, गोविंद सदगीर, अमोल केदारे, कोरडे, पंकज दराडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं