जन्मदातीच बनली वैरीण; दहा महिन्याच्या मुलाला फेकले विहिरीत

वाशीम प्रतिनिधी। बहीणीच्या नवऱ्यासोबत असलेले अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईने स्वत:च्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा आधी गळा दाबून जीवे मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना शेलूबाजार येथे उघडकीस आली. याप्रकरणी निर्दयी आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. शौर्य माहुलकर अस मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याच नाव आहे.

पोलिसांनी संगीता माहुलकर आणि बहिणीचा नवरा शरद खुरसडे या दोघांना अटक केली आहे. आरोपी संगीता ही आपल्या दहा महिन्यांच्या मुलाला घेऊन बहिणीकडे गेली होती. संगीताचे आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध होते. दोन दिवस राहून संगीता जेव्हा घरी आली त्यावेळी तीच्या सोबत शौर्य नसल्याने नवऱ्याने याबाबत विचारणा केली. त्यावेळी तीने उडवाउडवीची उत्तरे दिली.

संगीता आणि शरद यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय संगीताच्या बहिणीला होता. मात्र, वारंवार सांगून देखील तिचे येणे चालू होते. आपल्या संबंधात मुलगा अडसर होत असल्यान शरद आणि संगीतान मुलाला संपवण्याचा डाव रचला आणि त्याचा खून करून मृतदेह गावाजवळच्या विहिरीत फेकून दिला. दरम्यान, संगीताच्या नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी संगीताला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तसेच यामध्ये शरद याने मदत केल्याच संगीतान सांगितल. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

You might also like