स्वतः मृत्यूच्या दारात असतानादेखील आईने लेकाला वाचवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकते, कोणत्या संकटाशी दोनहात करू शकते याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या पोटच्या लेकाला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंंगावर अक्षरशः काटा येईल.

https://twitter.com/vibeforvids/status/1518326471109976065

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एका बाईकवरून तीन लोक जात आहेत. या बाईकवर एक पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगा आहे. इतक्यात एक कार या बाईकच्या अगदी जवळून जाते, त्यावेळी ती बाईकला धडकते. यामुळे बाईकवरील महिला आणि मुलगा रस्त्यावर कोसळतात. कार तर पुढे निघून जाते. ज्या बाईकवरून हे दोघं पडतात ती बाईकही थोडी पुढे जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे आपल्या त्यांच्याकडे लक्ष जातं.

यादरम्यान बाइकवरील महिला आणि मुलगा रस्त्यावर कोसळताच दुसऱ्या बाजूने एक भरधाव ट्रक येतो. ट्रकचे चाक त्या मुलाच्या अंगावरून जाणार तोच ती महिला त्याला खेचून घेते आणि त्याचा जीव वाचवते. थोडा जरी वेळ गेला असता तरी चाक या मुलाच्या अंगावरून गेलं असतं. पण त्याच्या आईने तसं होऊ दिले नाही. तिचा जीवही धोक्यात होता, पण त्या परिस्थितीमध्येसुद्धा आईने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाचा जीव वाचवला. हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे.

Leave a Comment