Thursday, March 30, 2023

आई वाचली, दोन चिमुकल्यांचा मृत्यू : सांगली जिल्ह्यात विहीरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

सांगली | जत तालुक्यातील खैराव येथे एका महिलेने रागाच्या भरात दोन मुलासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई बचावली, मात्र दोन्ही बालकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला.

या घटनेत सुप्रिया शंकर बुरुंगले (वय -2 वर्षे) आणि समर्थ शंकर बुरुंगले (वय- 9 महिने) असे मृत झालेल्या बालकांची नावे आहेत. तर रूपाली शंकर बुरुंगले (वय- 40, मुळगाव- लोणार, ता. मंगळवेढा) असे वाचलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रागाच्या भरात निष्पाप बालकांचा अंत झाला आहे. या घटनेमुळे लोणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रूपाली शंकर बुरुंगले हिचे लोणार (ता.मंगळवेढा) येथील शंकर बुरगले यांच्याशी ४ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन मुले होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रुपालीने खैराव (ता. जत) हद्दीत नेल्या स्वतःच्या विहिरीत दोन्ही मुलाना टाकले. त्यानंतर स्वतः उडी घेतली. यात दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रुपालीने मोटर सोबत असलेल्या रस्सीला पकडल्याने ती बचावली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे.