मुलाच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने आईने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गुन्हेगारी तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक आत्महत्येची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. आपल्या मुलाने केलेल्या आत्महत्येचं (Suicide) दुःख सहन न झाल्याने एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
पालघरमधील सफाळे येथील कांद्रेभुरे या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलाने केलेल्या आत्महत्येचे (Suicide) दुःख सहन न झाल्याने आईनेही विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे. शैलेश पाटील या 26 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच शैलेशची आई कल्पना पाटील हिने देखील गावातील विहीरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

मृत शैलेश याची व्हॉट्सअ‍ॅपला एका मुलीसोबत मैत्री झाली होती. तसेच तो सेक्सटोर्शनचा बळी ठरल्याचा अंदाज शैलेशच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता मुलाच्या आत्महत्येचं (Suicide)दु:ख सहन न झाल्याने या महिलेनेही आत्महत्या (Suicide) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्या केलेला मुलगा शैलेश याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?