आईचे प्रयत्न अयशस्वी : विडणी येथे तारेला हात लागल्याने विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे

फलटण तालुक्यातील विडणी बागेचा मळा येथे विहिरीच्या कडेला असणाऱ्या सिमेंट खांबाला ताण दिलेल्या लोखंडी तारेत विज प्रवाह उतरला होता. त्या लोखंडी तारेला हात लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सुनिल ज्ञानदेव जाधव( वय- 40) असे मृत्यू पावलेल्याचे नांव आहे. सुनिल यांच्या आईने मुलगा सुनिल याला वाचविण्यासाठी काठीने प्रयत्न केले, मात्र ते अपुरे पडले.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विडणी येथील बागेचा मळा नावाच्या शिवारात भिंतीच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला लोखंडी ताण दिलेला होता. त्या लोखंडी तारेत वीज प्रवाह उतरला होता. त्या तारेला सुनिल ज्ञानदेव जाधव( वय 40) याने हात लागला होता.

घटनास्थळी असलेल्या सुनिलच्या आईसमोर हा प्रकार झाला. त्यावेळी सिमेंटच्या पोलला ताण दिलेल्या लोखंडी तारेत उतरलेल्या वीज प्रवाहाचा जोरदार शॉक बसला. यावेळी त्याची आई बेबीताई यांनी काठीने त्याला सोडवले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर सुनील जाधव यांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कर्णे करीत आहेत.

Leave a Comment