हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola ने नुकतेच बजेट सेगमेंट रेंजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Moto G13 लॉन्च केला आहे. 4G कनेक्टिव्हिटी असलेला या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. 5 एप्रिलपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. 64GB स्टोरेज क्षमता असलेल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,499 रुपये आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर सेट अप देण्यात आला आहे. यामध्ये 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरसहीत 50MP प्रायमरी सेन्सर मिळेल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सिक्युरिटीसाठी Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे. यामध्ये 5,000mAh च्या पॉवरफुल बॅटरी मिळेल जी 10 Watt चार्जिंगला सपोर्ट करेल. Moto G13 हा स्मार्टफोन Android 13 वर काम करेल. यामध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. जो 4GB LPDDR4x RAM सहीत जोडला गेलेला आहे.
या Moto G13 मध्ये HD+ रिझोल्यूशन असलेला 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आले आहे. Motorola च्या या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 90Hz, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89.47 टक्के आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/motorola-g13-matte-charcoal-128-gb/p/itmb7de00f096581
हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल