Moto G13 : Motorola ने लाँच केला परवडणारा Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Motorola ने आज आपला नवीन स्मार्टफोन Moto G13 लॉन्च केला आहे. सर्वसामान्य लोकांना सुद्धा परवडेल अशा किमतीत आणि खास फीचर्ससह कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 5000mAh ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेराने हा मोबाईल सुसज्ज आहे. चला आज आम्ही तुम्हाला Moto G13 चे फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.

6.5-इंचाचा डिस्प्ले –

Moto G13 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. मोबाईलची लांबी 162.7 मिमी, रुंदी 74.66, जाडी 8.19 मिमी आणि वजन 183 ग्रॅम आहे. हा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमसाठी Android 13 वर काम करतो. मोबाईलच्या प्रोसेसर बद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये Octa Core MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Moto G13

5000mAh ची बॅटरी-

मोबाईलच्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Moto G13 मध्ये 4 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. microSD कार्डच्या मदतीने तुम्ही हे स्टोरेज वाढवू शकता. स्मार्टफोनच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, 3.5mm हेडफोन जॅक आणि ड्युअल बँड वाय-फाय सारख्या फीचर्सचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेसाठी फोनला AI फेस अनलॉक आणि साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G13

50 मेगापिक्सेल कॅमेरा –

मोटो G13 च्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी मोटो 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G13

किंमत –

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन 5 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.