हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने भारतीय बाजारपेठेत एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G64 5G असे या मोबाईलचे नाव असून सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा किमतीत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. किंमत कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत, त्यामुळे खरेदीसाठी मोटोचा हा मोबाईल बेस्ट पर्याय मानला जात आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…..
6.5-इंचाचा डिस्प्ले –
Moto G64 5G मोबाईल मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाच्या फुल HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. कंपनीने हा मोबाईल 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच केला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता ये
कॅमेरा – Moto G64 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईलच्या पाठीमागील बाजूला 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी Moto G64 5G
मध्ये 6000mAh बॅटरी बसवली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Moto G64 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. मोटोचा हा स्मार्टफोन आइस लिलाक, पर्ल ब्लू आणि मिंट ग्रीन रंगात उपलब्ध आहे. तुम्ही फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे हा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल.