Moto X40 लॉन्च; 60 MP सेल्फी कॅमेरा अन् बरंच काही… किंमतही पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध (Moto X40) हँडसेट निर्माता कंपनी मोटोरोलाने आपल्या लेटेस्ट X सीरीज अंतर्गत आपला नवा स्मार्टफोन Moto X40 लॉन्च केला आहे. यामध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे MOTO च्या या स्मार्टफोनला ६० MP चा कॅमेरा आहे. आज आपण जाणून घेऊया या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि त्याच्या किमतीबाबत….

Moto X40

6.7-इंच डिस्प्ले – (Moto X40)

या स्मार्टफोनला 165 Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल-एचडी प्लस कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR10 प्लसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित MIUI 5.0 आउट ऑफ द बॉक्सवर कार्य करतो. Moto X40 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असून 12GB LPPDR5x रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज आहे.

60 MP फ्रंट कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेराबाबत (Moto X40) बोलायचं झाल्यास, या स्मार्टफोनच्या पाठीमागील बाजूस ३ कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा वाइड-एंगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी, 60-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto X40

4,600mAh बॅटरी –

मोटोच्या या मोबाईलला 4,600mAh बॅटरी आहे जी १२५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते . कंपनीच्या दाव्यानुसार, या मोबाईलची बॅटरी फक्त 7 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. यात 15W वायरलेस चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे. Moto X40 हा ड्युअल-सिम 5G स्मार्टफोन आहे. यात Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3 साठी सपोर्ट मिळतो.

Moto X40

किंमत –

या Motorola मोबाईलची किंमत (Moto X40) त्याच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्ट नुसार ठरवण्यात आली आहे. त्यानुसार 8 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3399 चीनी युआन (सुमारे 40,373 रुपये) आहे. 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3699 चीनी युआन (सुमारे 43,936 रुपये), 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 47,499 रुपये आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेज आहे, या मॉडेलची किंमत 51,063 रुपये आहे). हा मोबाइल सध्या चीन मध्ये लॉंच करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

108MP कॅमेरा असलेला OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा

Vivo Y35 5G : Vivo ने लॉन्च केला 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Redmi Note 12 Series लॉन्च; 200MP कॅमेरा अन् बरंच काही