Redmi Note 12 Series लॉन्च; 200MP कॅमेरा अन् बरंच काही….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल (Redmi Note 12 Series) निर्माता कंपनी Redmi ने अखेर चीनमध्ये Redmi Note 12 सीरीज सीरीज लॉन्च केली आहे. Redmi Note 12 सीरीज अंतर्गत ३ मोबाईल लॉन्च करण्यात आले आहेत ज्यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ यांचा समावेश आहे. तिन्ही मोबाईल मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह समान OLED पॅनेल डिस्प्ले आहे आणि 5000mAh बॅटरीने हे तिन्ही मोबाईल सुसज्ज आहेत. चला जणूं घेऊयात या मोबाईलची अन्य वैशिष्ठ्ये आणि याच्या किमतीबाबत …..

Redmi Note 12 5G चे फीचर्स –

Redmi Note 12 5G हा मोबाईल Android 12 च्या MIUI 13 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1200 nits आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Redmi Note 12 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे तर दुसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. व्हिडिओ कॉल (Redmi Note 12 Series) आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 5G मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची दमदार बॅटरी आहे.

Redmi Note 12 5G

Redmi Note 12 Pro चे फीचर्स –

Redmi Note 12 Pro मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस १२०० निट्स आहे आणि ती HDR10+ ला देखील सपोर्ट करते. फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह 12 GB LPDDR4x रॅम आणि ग्राफिक्ससाठी Mali-G68 GPU आहे. या मोबाईलला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. (Redmi Note 12 Series) सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro लाही 5000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 12 pro

Redmi Note 12 Pro+ ची वैशिष्ठ्ये –

Redmi Note 12 Pro+ मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 900 निट्स आहे आणि ती HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करते. फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह 12 GB LPDDR4x रॅम आणि ग्राफिक्ससाठी Mali-G68 GPU आहे. Redmi Note 12 Pro ला 200 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरा आहे. तसेच 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. Redmi Note 12 Pro 5000mAh बॅटरी ची बॅटरी देण्यात आली आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 12 Pro+

काय आहेत किमती- (Redmi Note 12 Series)

Redmi च्या या मोबाईलच्या किमतीबाबत (Redmi Note 12 Series) बोलायचं झाल्यास, यातील Redmi Note 12 ची सुरुवातीची किंमत सुमारे 13,600 रुपये आहे, तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,300 रुपये आहे. Redmi Note 12 Pro ची सुरुवातीची किंमत 19,300 रुपये आहे आणि Redmi Note 12 Pro + ची सुरुवातीची किंमत सुमारे 23,000 रुपये आहे. हे तिन्ही मोबाईल मिडनाईट डार्क, टाइम ब्लू आणि मिरर पोर्सिलेन व्हाईटमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

हे पण वाचा : 

Pixel 7 Pro : Google चा दमदार मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

WhatsApp वर लवकरच मिळणार हे 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Oppo A17 : 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी; Oppo ने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन

Hero Vida V1 : Hero MotoCorp ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Moto G72 : Motorola ने लॉन्च केला 108 MP कॅमेराचा दमदार स्मार्टफोन; पहा किंमत