Motorola Edge 50 Pro 5G : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola ने आपला पहिला AI मोबाईल लाँच केला आहे. Motorola Edge 50 Pro 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 4500mAh ची शक्तिशाली बॅटरी सह अनेक AI फीचर्स मिळतात. कंपनीने या मोबाईलची सुरुवातीची किंमत 27999 रुपये ठेवली आहे. आज आपण या moto च्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.
6.7 इंचाचा डिस्प्ले –
मोटोरोलाच्या या मोबाईल मध्ये 144 Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ला 1.5k रिझोल्यूशन आणि 2000 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 7 जेनरेशन 3 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन एंड्रॉयड 14 वर आधारित हेलो यूआई या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. Motorola Edge 50 Pro 5G हा मोबाईल IP68 अंडरवॉटर प्रोटेक्शनसह लॉन्च करण्यात आला असून सुरक्षिततेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलाय.
कॅमेरा – Motorola Edge 50 Pro 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Edge 50 Pro 5G मध्ये AI पॉवर्ड कॅमेरा मिळेल, जो AI ॲडॉप्टिव्ह स्टेबिलायझेशन, ऑटो फोकस ट्रॅकिंग सारखी विशेष फीचर्स देईल. या मोबाईल फोनमध्ये, ग्राहकांना 50MP प्राथमिक कॅमेरा, 13MP मॅक्रो-अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी 4500mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 125W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा, तर Motorola Edge 50 Pro 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर 12GB + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. 9 एप्रिल 2024 पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून ग्राहक हा मोबाईल खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन लक्स लॅव्हेंडर, ब्लॅक ब्यूटी आणि मूनलाइट पर्ल या रंगात उपलब्ध असेल.