हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात दररोज अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच होत असतात. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना कमी पैशात आणि स्वस्त किमतीत मोबाईल खरेदी करणं परवडत. कमी खर्चात जास्तीत जास्त फीचर्स मिळणारा मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने स्वस्तात मस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Motorola G04S असे या मोबाईलचे नाव असून त्याची किंमत ७००० रुपयांपेक्षाही कमी आहे. आज आपण मोटोच्या या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत सविस्तर जाणून घेणार आहोत
6.6-इंचाचा डिस्प्ले –
Motorola G04S ला 6.6-इंचाच्या HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. मोटोरोलाने या स्मार्टफोन मध्ये T606 प्रोसेसर वापरला असून हा मोबाईल एंड्रॉयड 14 वर आधारित बेस्ड माययूएक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोटोरोला फोन सिंगल व्हेरिएंट 4GB + 64GB स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आली असली तरी ४ जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने हीच रॅम ८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा -Motorola G04S
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola G04S मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसतिष मोटोचाय या हँडसेट मध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5, ड्युअल-सिम, वाय-फाय 802.11 एसी, ग्लोनास आणि GPS सारखी वैशिष्ट्ये आहेत.
किंमत किती?
आता राहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मोबाईलच्या किमतीचा.. तर Motorola G04S च्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. 5 जून रोजी दुपारी 12 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मोटोरोला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.