औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यासह जिल्ह्यातही कोरोना निर्बंध लावले होते. मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे रुग्ण संख्याही घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने औरंगाबाद जालनासह पंचवीस जिल्ह्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवरील नियमावलीचे सविस्तर आदेश जारी होतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे त्यामुळे निर्बंध उठवण्यात यावेत अशी मागणी व्यापार्यांकडून वारंवार केली जात आहे. आता व्यापाऱ्यांमध्ये बाजारपेठा खुल्या होण्याची आशा निर्माण झाली आहे.