New IT Portal : 25.82 लाखांहून अधिक ITR दाखल, 7.90 लाखांहून अधिक ई-पॅन जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलवर (New IT Portal) गोष्टी व्यवस्थित होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात 25 लाखांहून अधिक रिटर्न (ITR) दाखल करण्यात आले आहेत, 3.57 कोटीहून अधिक यूनिक लॉगिन (Unique Logins) केले गेले आहेत तर 7.90 लाखांहून अधिक ई-पॅन जारी केले गेले आहेत. ताज्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.

उल्लेखनीय आहे की, या पोर्टलवर सुरुवातीला अनेक तांत्रिक गोंधळांच्या तक्रारी आल्या. टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ई-फाइलिंग 2.0 वेबसाईट आता योग्यपणे सुरु झाली आहे आणि प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा चांगली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन आठवड्यांत 25,82,175 इनकम टॅक्स रिटर्न (ITRs) वेबसाइटद्वारे यशस्वीरित्या दाखल करण्यात आले, करदात्यांनी एकूण 4,57,55,091 लॉगिन केले आणि 3,57,47,303 विशिष्ट (भिन्न ओळख) लॉगिन केले. PAN आधारशी जोडण्यासाठी वेबसाइटला 69,45,539 यशस्वी विनंत्या मिळाल्या, तर त्याद्वारे 7,90,404 ई-पॅन देण्यात आले.

दररोज 1.5 लाख ITR भरले गेले आहेत
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, वेबसाइटवर गोष्टी व्यवस्थित होत आहेत. विशेष म्हणजे सर्व गोष्टी एकामागून एक योग्यरित्या काम करत आहेत. आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, वेबसाइट लवकरच सामान्यपणे सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून दररोज 1.5 लाख ITR भरले गेले आहेत.

7 जून रोजी नवीन पोर्टल सुरू झाले
हे नवीन आयकर पोर्टल http://www.incometax.gov.in 7 जून रोजी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी इन्फोसिसने ही नवीन वेबसाईट तयार केली आहे. इन्फोसिसला नेक्स्ट जनरेशन इन्कम टॅक्स फाइलिंग सिस्टम विकसित करण्याचा टेंडर 2019 मध्ये देण्यात आले होते. यामागील उद्दीष्ट रिटर्नची छाननी वेळ 63 दिवसांवरून एक दिवसावर आणणे आणि रिफंडच्या प्रक्रियेला गती देणे हा होता.

Leave a Comment