मोझांबिकमध्ये नरसंहार, ISIS च्या दहशतवाद्यांनी केला 50 जणांचा शिरच्छेद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मापुटो । दक्षिण आफ्रिकेचा देश मोझांबिकमध्ये (Mozambique) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या अतिरेक्यांनी एका खेड्यातील 50 जणांचे शिरच्छेद केले. हा भयंकर नरसंहार काबो डेलगाडो राज्यातील नानजबा गावात घडला. फुटबॉलच्या मैदानात 50 जणांचा बळी घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मृतदेहांचे तुकडे जंगलात फेकले. त्याचवेळी या गावातील महिलांचे अपहरण करून त्यांना लैंगिक गुलाम केले गेले.

बीबीसी आणि डेलीमेलच्या वृत्तानुसार, गावातील महिलांच्या अपहरणानंतर दहशतवाद्यांच्या आणखी एका गटाने गावाला आग लावली. गावातील अनेक घरे जळून खाक झाली आहेत. दहशतवाद्यांनी गावात घोषणाबाजी केली. घरे जाळण्यास सुरुवात केली लोक घराबाहेर पडताच त्यांना पकडून नेण्यात आले आणि त्यांचा शिरच्छेद केला.

मोझांबिकमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी खून केलेल्या पन्नास जणांपैकी बहुतेक तरुण आणि मुले होती. या लोकांनी दहशतवाद्यांमध्ये सामील होण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात त्यांना ही वेदनादायक शिक्षा मिळाली. इस्लामिक दहशतवाद्यांनी अल्ला हूं अकबर म्हणवून घेत या 50 जणांचे शिरच्छेद केले आणि नंतर त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या शरीराच्या अवयवांना दफन करण्यासाठी पाठविले.

मोझांबिकचे कॅबो डेलगॅडो राज्य नैसर्गिक वायूसाठी प्रख्यात आहे. सन 2017 पासून गेल्या तीन वर्षांत या इस्लामिक दहशतवाद्यांनी या भागात आतापर्यंत 2 हजार लोकांचा बळी घेतला आहे. या दहशतवाद्यांच्या भीतीमुळे सुमारे 4.30 लाख लोक राज्य सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत.

या घटनेपूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी देखील 50 लोकांचे शिरच्छेद करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एक्सॉन मोबिल आणि टोटल गॅस प्रोजेक्टजवळ या घटना घडवून आणल्या. या उर्जा विकास प्रकल्पांच्या आगमनानंतर गेल्या काही महिन्यांत या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment