संसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती – खासदार संभाजीराजे छत्रपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी नांदेड येथे मराठा समाजाच्या मूक आंदोलनाप्रसंगी हजेरी लावली. “लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी काही केले नाही. राज्य सरकार म्हणतंय आरक्षण केंद्राने उडवलं. केंद्राने ५० टक्केचा आरक्षणाचा नियरण्य घ्यावा अशी मीही मागणी केली आहे. मला जर आरक्षणाच्या मुढयावर बोलू दिले नसते तर मी संसदेत खासदारकी सोडली असती. आरक्षण परत मिळवायचे असेल तर सामाजिक, आर्थिक मागसलेपण सिद्ध करावे लागेल, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील मराठा आरक्षण मूक मोर्चावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार म्हणतंय केंद्राने आरक्षणप्रश्नी मर्यादा वाढवावी. राज्याची जबाबदारी आहे कि, मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध केआवे. केंद्राने सांगितले तरी आरक्षण ध्यायचे कुठून? हा प्रश्न आहे. केंद्राला विंनती करतो कि, जर आरक्षण द्यायचे असेल तर योग्य, ठोस निर्णय घ्या. केंद्राने आरक्षणाची पन्नास टक्केच्यावर आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी. आणि राज्य सरकारची जबाबदारी हि आहे की, तुम्ही जर मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे, हि जबाबदारी आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/videos/372863727614045

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना छत्रपती म्हणाले की, नांदेडचे सुपुत्र दिल्लीत आले. ते मला भेटले नाही. त्यांना एकच सांगणे आहे की, मराठा समाजाला दिशाहीन बनव्याची चूक करू नका. हे घडू देणार नाही. त्यांना आव्हान करतो कि त्यांनी समोरासमोर येऊन आरक्षणाच्या मुढयावर चर्चा करावी.

Leave a Comment