छिंदवाडा । तुम्ही तो हिंदी चित्रपट पहिलाच असेल ज्यात एक उद्योगपती आपली संपूर्ण संपत्ती इमानदार कुत्र्याच्या नावावर करतो. एंटरटेनमेंट असं या चित्रपटाचं नाव आहे. ही तर झाली चित्रपटाचं कथा. मात्र हीच कथा सत्यात उतरली तर. हो छिंदवाड्यातल्या एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्यानंदेखील त्याची संपत्ती कुत्र्याच्या नावे केली आहे. या कुत्र्याचं नाव जॅकी आहे.
मुलाची वर्तणूक चांगली नसल्यानं ओम नारायण वर्मा यांनी त्यांची अर्धी संपत्ती कुत्र्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. जॅकी ओम नारायण यांची काळजी घेतो. तो सदैव त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे वर्मा यांनी जॅकीला संपत्तीत निम्मा वाटा दिला आहे. जॅकीचा सांभाळ करणाऱ्याला त्याच्या नावे असलेली संपत्ती मिळेल, असं वर्मांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे. छिंदवाड्याच्या बारी बडा गावात राहणाऱ्या ५० वर्षीय ओम वर्मा यांनी दोन लग्नं केली. पहिल्या पत्नीपासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत. ओम वर्मा यांनी त्यांच्या संपत्तीचा निम्मा हिस्सा त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर केला आहे. तर उर्वरित निम्मा हिस्सा कुत्रा जॅकीच्या नावे केला आहे.
माझी दुसरी पत्नी चंपा वर्मा आणि कुत्रा जॅकीच माझा सांभाळ करतात, असं वर्मा यांनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे. ‘पत्नी चंपा आणि जॅकी कुत्रा यांच्यावर माझं सर्वाधिक प्रेम आहे. त्यामुळे माझ्या संपत्तीत दोघांना अर्धा-अर्धा वाटा मिळेल. पुढे जी व्यक्ती जॅकीची काळजी घेईल, त्यालाच त्याच्या मालकीची संपत्ती मिळेल,’ असं वर्मा यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’