Monday, January 30, 2023

खासदार छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून 20 कोटींचा निधी मंजूर

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

केंद्राच्या सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मधून सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या कामासाठी आणि कराड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, गारवडे साजुर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन या राज्य मार्गाच्या कामासाठी चार कोटी 91 लाख रुपये असा एकूण सुमारे 20 कोटींचा निधी खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यालयातून पत्रकाद्वारे माहीती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पत्रकात म्हटले, की जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता खासदार उदयनराजे नेहमीच प्रयत्न करीत असतात. रस्ते मजबूत असतील तर दळणवळण सोयीचे होतेच. तथापि, सुरक्षित दळणवळणाची सुविधा निर्माण होण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेन्ट्रल रोड फंड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

कराड तालुक्यात गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रस्तावांनाही निधी

कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली ते शेणोली रेल्वे स्टेशन या राज्य महामार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी उदयनराजे भोसले यांनी कराड नगपालिकेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या समवेत प्रस्ताव दिला होता. तसेच सातारा शहराची झालेली हद्दवाढ विचारात घेऊन वाढे फाटा ते पोवई नाका या सातारा शहरातील रस्त्याची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या सेन्ट्रल रोड फंडमधून या दोन्ही कामांसाठी एकूण सुमारे रुपये 20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group