Tuesday, June 6, 2023

उद्धव ठाकरे तुम्ही तारीख अन् वेळ सांगा, मला कोण अडवतंय ते पाहते – नवणीत राणा

अमरावती : नवणीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसा विषयावरुन चांगलंच धारेवर धरलंय. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचणार या राणा यांच्या विधानानंतर शिवसैनिकांनी राणा दांम्पत्याला आव्हान दिलं होतं. यावर आता खासदार नवणीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी तारीख आणि वेळ द्यावी, त्या दिवशी मुंबईत येऊन दाखवते अशा शब्दात राणा यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी तारीख आणि वेळ द्यावी, त्या दिवशी मुंबईत येऊन दाखवते. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे त्यामुळे या दोन्ही ताकद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे कोण मला मुंबईत येण्यापासून थांबवतो आणि तुमच्यात किती ताकद आहे ते पाहूया अस आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

मी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना देवाचे नाव घ्यायला सांगत आहे. त्यामुळे जर ते माझा निषेध करत असतील तर तो निषेध मी कबूल करते. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार विसरले असून त्यांचा मार्ग भरकटला असल्याचेही नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले आहे.

जे शिवसैनिक आज माझा निषेध करायला मातोश्री बाहेर उभे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की, जरा मातोश्री मध्ये जावा आणि मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा वाचायला सांगा. आणि महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्या की तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरले नाहीत, जर तुम्ही हनुमान चालीसा नाही वाचली तर स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलं आहे.