उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन (farmer agitation) करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, यासाठी ते आंदोलन (farmer agitation) करत आहेत. यादरम्यान अजून वेळ गेली नाही, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाला दिला आहे.
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर
शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे 4 दिवस आमरण उपोषण करूनही मिळाले नाही. 4 दिवस संयमाने आंदोलन (farmer agitation) केले मात्र तरीही न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून न्याय घयावा लागेल याची आठवण मी कार्यकर्ते यांना करुन देतो असे ते यावेळी म्हणाले. तसेच यापुढे प्रशासनाने दक्ष राहावे कारण आंदोलनामुळे (farmer agitation) वाईट परिणाम भोगावे लागतील. कायदा सुव्यवस्थित बिघडली जाणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत खासदार ओमराजे यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालवली असली तरीदेखील ते आंदोलनावर ठाम आहेत. यानंतर कैलास पाटील यांच्या समर्थनात उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन (farmer agitation) केले आहे. शेतकऱ्यांना विमा, अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी एकीकडे आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी