खासदार राजीव सातव अनंतात विलीन; हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं काल (ता.१६) पहाटे ५ वाजता कोरोनाने निधन झालं.पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमा झाले होते. तसेच काँग्रेससह इतर पक्षांतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या जाण्यानं राजकीय वर्तुळात एक पोकळीच निर्माण झाली आहे.राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे, अशा शब्दात अनेक नेते मंडळींनी दु:ख व्यक्त केलं.हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांसह इतर अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

राजीव सातव 2014 साली हिंगोली लोकसभा मतदार संघातून खासदारपदी निवडून आले होते.राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलंचं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते टीम राहुलचे कोअर कमिटी सदस्य होते.

Leave a Comment