मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे – राष्ट्रपतींची भेटीची वेळ ठरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. याबाबत संसदेतही सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाजप खासदार तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आता राष्ट्रपतींनी २ सप्टेंबर हि भेटीची वेळी दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी दि २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज आपण सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत. त्यामुळे त्यांनीही यासाठी उपस्थित राहावे.

खासदार संभाजीराजे छत्रपतींनी नांदेड येथे झालेल्या मराठा क्रान्ति मूक आंदोलनात राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या नेत्रित्वाखाली इतर केलेल्या आंदोलनात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सर्व सवलती मिळाव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने तरुणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासह अनेक मागण्याहि केलेल्या आहेत.

Leave a Comment