औरंगाबाद : मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. काल खासदार संभाजीराजे भोसले यांनी कायगाव टोक येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. तसेच कोपर्डी येथे भेट सुद्धा दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारनं दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. अशा कुटुंबातील एकाला लवकर नोकरीवर घ्या, अशी विनंती संभाजीराजे यांनी सरकारला केलीय. त्याचबरोबर मराठा आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केलीय.
तसेच आता समाजाची भूमिका संपली, आता नेत्यांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरावे आणि सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. कोर्टाने ती फेटाळल्यास तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी, नंतर आयोग स्थापन होईल असे केल्यानेच मराठा समाजाला असंरक्षण मिळेल असे ते म्हणले. तर ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात असेही ते म्हणले.
दरम्यान, आता संपूर्ण महाराष्ट्रात मूक आंदोलन आणि लॉंगमार्च काढू असा इशाराही त्यांना यावेळी दिला. यावेळी कायगाव येथी समस्त गावकरी तसेच अनेक मराठा संघटना तेथे उपस्थित होत्या