Thursday, February 2, 2023

नक्षलवाद्यांना जे कळत ते नाकर्त्या राज्य सरकारला कधी कळणार : विनायक मेटेंची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारवर वारंवार टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे अनेक उपाय केले जात आहेत. या आरक्षनाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनीही भाष्य केले आहे. नुकतेच नक्षलवादी संघटनेने पत्र लिहील्यानंतर शिवसंग्राम संघट्नेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “नक्षलवाद्यांना आरक्षण प्रश्नी जे कळत ते या नाकर्त्या राज्य सरकारला कधी कळणार,” अशा शब्दात मेटेंनी टीका केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, ” मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून नुसतं राजकारण केलं जात आहे. आरक्षणप्रश्नी नक्षलवाद्यांना जे कळत ते या राज्य सरकारला का कळत नाही.

- Advertisement -

या मराठा समाज बांधवाना आतापर्यंत आरक्षण मिळालेले नाही. या राज्य सरकारच्या नाकर्त्यपणामुळेच आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. हे सरकार स्वार्थाच्या पलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे या सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्यावे,” अशी मागणी मेटेंनी केली. आरक्षणाच्या प्रश्नावरून मेटेंनी पुन्हा मोर्चा काढण्याचाही इशारा यावेळी दिला आहे.