खासदार उदयनराजेंनी आ. सत्यजित तांबेंच्या गळ्याला लावला फास; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
एखादे राजकीय नेते एकमेकांना खूप दिवसानंतर भेटल्यावर त्याच्यामध्ये अनेक गंमती जमती घडतात. अशीच एक गंमतीशीर घटना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी घडली. या ठिकाणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आणि साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. यावेळी उदयनराजेंनी आ. तांबे यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. उदयनराजेंनी तांबेंच्या गळ्यात शाल घातली आणि त्याशालीचा फास आवळला. आमदार साहेब तुम्हाला असा फास लागला होता, मी नाही तर इतरांनी लावला होता, असे खा. उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. ते जितके मवाळ तितकेच तापट स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडून अनेकवेळा त्यांच्या जलमंदिर इथे अथवा एखाद्या कार्यक्रमात राजकीय नेता भेटला कि त्याची टिंगल टवाळी केली जाते. दरम्या, आज साताऱ्यात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याशी उद्यनराजेंची भेट झाली. दोघांच्यात भेटीवेळी अनेक किस्से घडले.

 

सोमवारी दुपारी आमदार तांबे साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आले असता खासदार उदयनराजेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुष्पगुच्छ दिल्यानंतर उदयनराजेंनी पाहत शाल घेत त्यांच्या गळ्यात गाठली. यावेळी त्यांनी आ. तांबे यांच्या गळ्याभोवती ती शाल आवळली. शाल आवळत उदयनराजेंनी आमदार तांबे साहेब तुम्हाला असाच फास लागला होता. तो मी नाही तर बाकिच्यांनी लावला होता लक्षात ठेवा, असे म्हंटले. दोघांच्यातील या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.