Mpox Virus | तीन वर्षांपूर्वी कोरोना या विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले होते. आता कुठे या विषाणूतून जग संपूर्णपणे सावरलेले दिसत आहे. परंतु कोरोना या विषाणूचा प्रभाव जरी कमी असला, तरी आता जगापुढे एक नवीन संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे आता संपूर्ण जगामध्ये एमपॉक्स या विषाणूचे संकट आलेले आहे. जगातील जवळपास 116 देशांमध्ये एमपॉक्स (Mpox Virus) या विषाणूचा फैलव झालेला आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स देखील म्हणतात. सध्या या एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा जवळपास 1958 मध्ये हा विषाणू माकडांमध्ये सापडला होता आणि त्यानंतर हा विषाणू मानवामध्ये पसरू लागला.
भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव किती आहे. हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या भारतामध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव नाही, तरी जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, जानेवारी 2022 ते जून 2024 या दरम्यान एमपॉक्सची 27 प्रकरणे भारतात नोंदवली गेलेली आहे. आणि या विषाणूमुळे आतापर्यंत भारतात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात या विषाणूचा कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. कारण त्यावर सध्या लस देखील उपलब्ध आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळावर काटेकोर निरीक्षण करण्यास सांगितलेले आहे. जर तुम्ही वेळेवर या रोगाची लक्षणे ओळखली तर हा आजार नक्कीच नियंत्रित करता येतो.
एमपॉक्सची लक्षणे | Mpox Virus
एमपॉक्स या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची त्वचा लाल होते आणि दोन ते तीन आठवडे ती तशीच राहते. तसेच त्या रुग्णाला जास्त प्रमाणात ताप येतो, घसा खवखवतो, डोकेदुखी, स्नायू दुखी, पाठ दुखी आणि थकवा येत असतो.
जागतिक आरोग्य संघटनेने काय सांगितले
सध्या जगातील एमपॉक्स या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे. सध्या अनेक देशांमध्ये या एमपॉक्स रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे देखील सांगितलेले आहे.