नवी दिल्ली | देशात सर्वात स्वस्त कॅन्टीन म्हणून संसदेमध्ये असलेल्या कॅन्टीन प्रसिद्ध आहेत. कॅन्टीनमध्ये खूप कमी किमतीमध्ये चांगले जेवण मिळत असते. पण आता जेवणावर असलेली सबसिडी काढून टाकण्यात आली असून, आता कॅन्टीन भारतीय उत्तर रेल्वे ऐवजी आयटीडीसी चालवेल. तसेच जेवणाच्या किमतीही वाढणार आहेत.
सबसिडी काढून टाकल्यामुळे यापुढे कमी किंमतीमध्ये जेवण मिळणे बंद होणार आहे. सबसिडी बंद केल्यामुळे लोकसभा साचिवालयाचे 8 कोटीच्या जवळपास खर्च वाचणार आहे. कमी किमतीचा चार्ट वरती यापूर्वी मिम बनवले जात होते.
लोकसभेचे काही दिवसांमध्ये बजेट सत्र येत असून याची तयारी आतापासूनच सुरू आहे. सर्व खासदार आणि त्यांचे सोबती यांची कोवीड टेस्ट करण्यात येईल आणि यापुढे कॅन्टीनची सबसिडी टेंडर बदलण्यात येईल. अशी माहिती लोकसभेचे सभापती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.