MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होणार आहे. तर मुख्य परीक्षा 7 ,8, 9 मे रोजी होणार असून या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागेल.

यामध्ये राज्य सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा , महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा , महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा याशिवाय इतर परीक्षांचं आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार आहे.

अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येनार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला येणार आहे. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

You might also like