हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक विद्यार्थी हे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. आता त्याच विद्यार्थ्यांचा एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत विविध पदांसाठी भरती चालू होणार आहे. आणि या संदर्भातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता कमाल वयोमर्यादित शिथिलता देण्यात येणार आहे. आता या मोठ्या निर्णयामुळे महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत दिलेली आहे. वयोमर्यादेत शिथिलता आल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत 7 जानेवारी 2025 मुदत पर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे चलनाद्वारे 9 जानेवारी 2025 पर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहेत. परंतु आता वयोमर्यादित शिथिलता आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरता येणार आहे.
शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीमध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंत उच्च वयोमर्यादित एक वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 01 जानेवारी 2025 ते सदर शासन निर्णय तारखेपर्यंतच्या पदवीधरासाठी या जाहिराती नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या जाहिरातींच्या प्रवेश प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही. अशा जाहिरातींसाठी सर्व उमेदवारांना कमाल वयोमर्यादित एक वर्षाची वाढीव शिथिलता देण्यात आलेली आहे.