हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर एकाच दिवशी आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ठेवल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारलं होते. त्या आंदोलनाला आलेलं ये यश म्हणावं लागेल. कारण २५ ऑगस्टला होणारी हि परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( Maharashtra Public Service Commission) ट्विट करत म्हंटल, आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरलं आहे. कारण आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन (MPSC Students Protest Pune) सुरू केले होते.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
शरद पवारांनी आंदोलनात सहभाग घेण्यापूर्वीच निर्णय –
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यांनी ट्विट करत म्हंटल होते कि, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं ट्विट शरद पवार यांनी केलं होते. मात्र शरद पवार या आंदोलनात उतरण्यापूर्वीच हाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
फडणवीसांनी मानले आभार – MPSC Exam Postponed
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आभार व्यक्त केलं. काल एमपीएससी अध्यक्षांना MPSC Exam Postponed) मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.