पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या दिनांक 17 फेब्रुवारी रोजी राज्यात घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी विद्यार्थ्यांना ओळखपत्राची रंगीत छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या पाच ओळखपत्रांपैकी एका ओळखपत्राची रंगीत छायांकीत प्रत प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्रपणे सादर करावी लागेल अन्यथा परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात येईल. याबरोबरच विद्यार्थ्यांना मूळ ओळखपत्र देखील सोबत बाळगावे लागेल.