MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी आत एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज दाखल करू शकतात. ही भरती विविध विभागातील 2021 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे.
कोणत्या पदांवर होणार भरती
MPSC च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक या पदांची भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या माध्यमातून उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलिफ व लिपिक, नगरपाल (मुंबई कार्यालय), तसेच लिपिक टंकलेखक अशा पाच पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सहायक नगर रचनाकार, श्रेणी एक, गट ब या परीक्षेतून सहायक नगररचना कार, नगर रचनाकार आणि गट अ या संवर्गातील परीक्षेच्या माध्यमातून नगर रचनाकार पदासाठी भरती केली जाणार आहे.
कशी असेल पदसंख्या
गट क संवर्ग – 1333 पदे
गट ब (अराजपत्रित) – 480 पदे
सहायक नगर रचनाकार, गट ब – 148 पदे
नगर रचनाकार, गट अ – 60 पदे