अमृता फडणवीसांनी कोरोना योध्यांसाठी हातात घेतला माईक; म्हटलं आभार गीत

मुंबई । कोरोनाच्या लढाईत जिवाजी पर्वा न करता डॉक्टर, नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाची लढाई ते संपूर्ण समर्पण देऊन लढत आहेत. अशा निडर कोरोना योद्धांचे मनोधर्य आणि आभार मानण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या राज्य आणि संपूर्ण देश अभूतपूर्व अशा संकटातून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी यासाठी अमृता फडणवीस यांच्या गाणं गाण्यामागे उद्देश असल्याचे सांगितलं जात आहे.

अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेतात. याआधी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा कोरोनावर गाणी प्रदर्शित केली आहेत. आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी हे गाणं समर्पित केलं आहे. चला तर पाहुयात अमृता फडणवीस यांच्या सुरेल आवाजातील हे गीत..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like