हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) मधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या चाहत्यांना अजूनही तो तितकाच प्रिय आहे. धोनी सध्या त्याचा जास्तीत जास्त वेळ रांची मध्ये घालवत असतो. त्याने रांचीतील रिंगरोडजवळ 7 एकरावर फार्म हाऊस (Farm House) बांधले असून, त्यात स्विमिंग पूल पासून ते पार्किंग पर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. हे फार्म हाऊस तयार होण्यासाठी जवळपास 3 वर्ष लागली. चला आज आपण पाहूया धोनीचे आलिशान फार्महाऊस…
एमएस धोनीचे फार्महाऊस जवळपास सातएकरमध्ये पसरले आहे आणि ते ईजा फार्म या नावाने ओळखले जाते. धोनीच्या फार्महाऊसमध्ये टरबूज, पेरू, पपई आणि स्ट्रॉबेरीसारख्या विविध प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड केली जाते.
या फॉर्म हाऊसमध्ये धोनीसाठी सरावासाठी जागा सुद्धा राखून ठेवली आहे. तसेच स्विमिंग पूल आणि जिम सारख्या लक्झरी सुविधा आहेत. धोनीची पत्नी साक्षी आणि जीवा यांनीही अनेकवेळा त्यांचे फार्म हाऊस वरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तुम्हाला तर माहित आहे की धोनी गाड्यांचा खूप मोठा शौकीन आहे. त्यासाठी त्याने आपल्या फार्म हाऊस वर खास कार आणि बाइक ठेवण्यासाठी मोठे गॅरेज सुद्धा बनवून घेतलं आहे. याशिवाय धोनीच्या फार्म हाऊसवर तुम्हाला घोडे सुद्धा पाहायला मिळतील.
धोनी अनेकवेळा आपल्या पाळीव कुत्र्यांशी खेळताना दिसला आहे. त्यामुळे धोनीच्या फार्म हाऊसवर त्याचे आवडते पाळीव प्राणीही दिसत आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी धोनीच्या या फार्म हाऊसला भेट दिली आहे.