हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनी….भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव…..सचिन तेंडुलकर नंतर ज्याला भारतीयांनी खऱ्या अर्थाने अक्षरशः डोक्यावर घेतलं. एक यष्टीरक्षक ते एक फलंदाज …एक फलंदाज ते एक कर्णधार ….आणि एक कर्णधार ते एक यशस्वी कर्णधार…. धोनीचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आयसीसी च्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीच नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे.धोनीने किती धावा काढल्या किंवा किती झेल पकडले यापेक्षा धोनी जोपर्यंत मैदानात आहे तो पर्यंत सामना भारताच्या हातात आहे ही चाहत्यांच्या मनातील भावना त्याच क्रिकेटमधील श्रेष्ठत्व सिद्ध करते.
सामन्याची परिस्थिती कशीही असो ….आपल्या शांत डोक्याने आणि व्यूहरचनेने धोनीने नेहमीच भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत.म्हणूनच असंही म्हणलं जायचं की ‘जो अनहोनी को कर दे होनी वह है महेंद्रसिंग धोनी’.
असं म्हणतात की धोनी ज्या गोष्टीला हाथ लावतो त्याच सोनं होतं.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. 2 विश्वचषक, 1 चॅम्पियन ट्रॉफी, 3 वेळा आयपीएल चषक, आणि कसोटी मध्ये नंबर 1 चा सिंहासन……भारताला या गोष्टी सगळ्या गोष्टी धोनीच्या नेतृत्वाखालीच मिळाल्या.
अस म्हणतात की कर्णधारच कर्तव्य असत की नवीन खेळाडू घडवणे. धोनी कर्णधार झाल्यानंतर संघातील गांगुली, लक्ष्मण, द्रविड हे वरिष्ठ खेळाडू एकामागून एक निवृत्त झाले.त्यावेळी काही प्रमाणात धोनी वर टीकाही झाली.परंतु धोनीने भविष्याचा विचार करून रैना, जडेजा, अश्विन, रोहित,आणि कोहली असे दिग्गज खेळाडू घडवले हे सुद्धा कोणी विसरू शकत नाही.सेहवाग ही सौरव गांगुलीची देणं आहे तसेच आपला सर्वाचा लाडका रोहित शर्मा ही धोनीची देणं आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 15000 हुन अधिक धावा…16 शतके..आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याने धावांचा पाठलाग करताना मिळवून दिलेले अनेक अशक्यप्राय विजय नेहमीच भारतीय चाहत्यांच्या स्मरणात राहील.
वाईट याच गोष्टींच वाटत की धोनीची अशी निवृत्ती कोणालाही अपेक्षित नव्हती. धोनीची शेवटची फेअरवेल मॅच नक्कीच व्हायला हवी होती. कारण ‘guard of honour’ चा धोनीच खरा मानकरी होता.