स्वार्थी धोनी!! त्या एका कृतीमुळे क्रिकेटप्रेमींची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी… भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू .. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सध्या भारतात आयपीएल सुरु असून खास धोनीचा बघण्यासाठी, त्याच्या बॅटिंगचा आनंद घेण्यासाठी चाहते स्टेडियमवर मोठ्या संख्येने येतात. धोनी (MS Dhoni) सुद्धा या वयातही ताबडतोब फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो, मात्र पंजाब विरुद्धच्या सामन्यात याच धोनीच्या एका कृतीने त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे. काही क्रिकेटप्रेमींनी तर यासाठी धोनीला स्वार्थी असेही म्हंटल… नेमकं असं घडलं तरी काय हे आपण जाणून घेऊयात

नेमकं काय घडलं –

कालच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांना खास अशी कामगिरी करता आली नाही. ऋतुराज गायकवाड वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. ऋतुराजने एक बाजू सांभाळत ठेवून चेन्नईला 150 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. मात्र तो 18 व्या ओव्हरमध्ये आऊट झाल्यानंतर महेंद्रसिंघ धोनी फलंदाजीला आला. धोनी आणि डार्लि मिचेल फलंदाजी करत होते. 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू बॅटवर नीट आला नाही आणि लॉन्ग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने गेला. त्यावेळी धोनीसोबत बॅटिंग करणारा डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) रन्स घेण्यासाठी पळाला. तो दुसऱ्या टोकाला पोहोचला होता. परंतु धोनी क्रीजमधून हललाच नव्हता… उलट धोनीने डार्लि मिचेललाच परत माघारी पाठवलं … धोनीचा आपल्या संघातील दुसऱ्या फलंदाजांवर विश्वास नाही का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला… आणि डार्लि मिचेल हा कोणी तळाचा गोलंदाज नव्हता तर चेन्नईचा मुख्य फलंदाज आहे.. न्यूझीलंड क्रिकेटकडून खेळतानाही त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत.

धोनीच्या या कृतीमुळे क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली .. सोशल मीडियावर यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. धोनीसारखा स्वार्थी खेळाडू अजूनही आम्ही बघितला नाही असं एका यूजर्सने म्हंटल … तर डार्लि मिचेलबाबत वाईट वाटलं .. तू धोनी असलास तरी हे योग्य नाही असं एका यूजर्सने म्हंटल …. तर आणखी एका यूजर्सने म्हंटल कि हा फक्त डार्लि मिचेलचा अपमान नाही तर संपूर्ण न्यूझीलंड क्रिकेटचा अपमान आहे ….. एकूणच काय तर धोनीच्या एका कृतीने तो हिरो पासून व्हिलन बनला.