हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … फक्त नावच काफी आहे … संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात धोनीचे लाखो करोडो चाहते आहेत .. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते स्टेडियमवर गर्दी करत असतात .. मैदानावर धोनीची एंट्री होताच माही माही या गजराने संपूर्ण स्टेडियम दमदमून जाते … इतकी प्रचंड क्रेझ धोनीची आहे .. त्यातच आता धोनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे . भविष्यात चेन्नईत महेंद्रसिंग धोनीचे मंदिर (MS Dhoni Temple) बांधले जाऊ शकते, असा दावा चेन्नई सुपर किंग्सचा माजी क्रिकेटर अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने केला आहे.
रायुडू म्हणाला, “गेल्या काही वर्षांतील भारत आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याची कामगिरी पाहता, चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर बांधले जाईल. दक्षिण भारतात त्याची क्रेझ लक्षात घेता हे आश्चर्यकारक नाही. धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत एमएस धोनीचे मंदिर चेन्नईमध्ये बांधले जाईल. धोनी हा असा व्यक्ती आहे जो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्याने नेहमीच संघासाठी, देशासाठी आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी, त्याच्या बॅटिंगचा आनंद घेण्यासाठी चेन्नईचे चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर जातायत . धोनीने सुद्धा आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. भलेही धोनी फलंदाजी साठी खालच्या क्रमांकावर येत असेल मात्र तरीही त्याने आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केलं. या मोसमात त्याने अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत चौकार-षटकार मारून प्रेक्षकांना खुश केलं. एमएस धोनीने यंदाच्या आयपीएल मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांमध्ये त्याने 226.67 च्या स्ट्राइक रेटने 136 धावा केल्या आहेत ज्यात 11 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचे १३ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुण झाले आहेत. चेन्नईचा संघ साधय पॉईंट्स टेबल मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करावे लागेल. धोनीसाठी तरी चेन्नईचा संघ प्ले ऑफ मध्ये जावावा अशी भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.