वीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video

अमरावती | सध्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का केली जाते अशी विचारणा करित महावितरणच्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. सोबतच ज्या नागरिकांची विजतोडणी केली ती जोडण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गावाबाहेर देखील काढले.

खरतर महावितरणने ग्राहकांना व्याजदर लावून वीजबिल दिलेत. अनेकांकडे रोजगार असल्याने बिले भरायची कशी हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे अशी खोचक टीका देखील माजी कृषिमंत्री अनिल बॉंडे यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like